
मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, वसतिगृह तसेच परिसरातील विविध सुविधांची पाहणी केली. तत्पूर्वी, त्यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्य रोहणी कदम (ढोले), नगराध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.