
यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शेख अब्दुल्ला यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना निरोप दिला.
याप्रसंगी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (गल्फ) आसीम महाजन, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र बोंबले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.