
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी करतांना परराष्ट्र मंत्री रुबियो यांना गेटवे ऑफ इंडिया आणि परिसराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वाची माहिती दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच अमेरिकेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.