
सर्वांनी आनंदात आणि सुरक्षितपणे दुर्गापूजेचा उत्सव साजरा करावा, तसेच मा दुर्गेची कृपा सर्वांवर राहो, अशा शुभेच्छा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिल्या.
बंगाल कल्चरल असोसिएशनच्या वतीने जुहू येथे आयोजित दुर्गापूजा समारोहाला राज्यपालांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना दुर्गापूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. बंगाल कल्चरल असोसिएशनचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णेंदू सेन उपस्थित होते.