
सप्ताहाच्या आयोजनात लोकसहभाग वाढविणे, लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे आणि विविध माध्यमांतून उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही आदिवासी विकासमंत्री डॉ. वुईके यांनी दिले.
या सप्ताहांतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांशी जोडणे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासकीय निवासस्थानी नियोजनासंदर्भात बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासह नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती विभागांचे अपर आयुक्त तसेच विविध जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.