
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार माधवी नाईक, महापौर शर्मिला पिंपोळकर, ठाणे महापालिकेचे उपमहापौर हनुमंत जगदाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.