
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील कॅबिनेट हॉलमध्ये हा करार झाला.
या करारामध्ये स्थानिक समुदायाच्या हिताचा विशेष विचार करण्यात आला आहे. प्रकल्प परिसरातील २३ स्टॉलधारकांचे स्टॉल पिकनिक स्पॉट, पार्किंग क्षेत्रात स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पग्रस्त पात्र व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी ताज ग्रुपकडून कौशल्य विकास व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात किंवा त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे.
यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंडारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते.