
स्वस्तिका घोष यांनी कौशल्यपूर्ण आणि दमदार खेळाच्या जोरावर प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राची मान उंचावण्याबरोबरच महाराष्ट्राच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वस्तिका घोष यांच्या यशाचे कौतुक करून पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.