
यावेळी महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आणि बंदरांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती खासदार शरद पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.