
शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प सादरीकरणाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ऑनलाईन व्ही.सी.द्वारे कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवामान बदल,पाणीटंचाई,जमिनीची घटती सुपिकता, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव,वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचा विभागनिहाय पिकवार अभ्यास करावा. पिकांची वाढ, पाण्याची गरज, जमिनीतील ओलावा, हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादन याबाबत विविध स्रोतांमधून माहिती संकलित करून एकत्रित सक्षम डिजिटल प्रणाली तयार करावी. मिळणाऱ्या माहितीचे मशीन लर्निंगच्या माध्यमातून विश्लेषण करून शेतकऱ्यांना पीकनिहाय आणि शेतनिहाय सल्ला देण्याची गरज असून जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.