
सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविण्याचे काम करताना शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा सक्तीने अवलंब करावा. भविष्यात शहरात होणाऱ्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावून एक सर्वसमावेशक ‘धोरण’ तयार करावे, संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर सक्त कारवाई करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.