
रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधील डॉ. सुनंदा म.गोसावी आर्ट गॅलरीत आजपासून छायाचित्र प्रदर्शन सुरू झाले. ते ३० ऑगस्ट, २०२६ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

उद्घाटन सोहळ्यास जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार सरोज अहिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत भक्ती चरणदास महाराज, रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.