
मधू कांबीकर यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोककलेचा अस्सल बाज आयुष्यभर जपला. लोककलेच्या व्यासपीठावर सुरू झालेला त्यांचा प्रवास मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीने आणि लावणीच्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.