
‘नाला सुशोभीकरण मोहीम’ तसेच ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पार पडला. कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष नादिर गोदरेज, भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला, पंचशील रिअॅलिटीचे संस्थापक व अध्यक्ष अतुल चोरडिया, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पुरस्कारार्थी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या मदतीने नाल्याचे रूपांतर सुंदर, स्वच्छ आणि नागरिकांसाठी उपयुक्त जागेत करता येते, हे या प्रकल्पातून दिसून येते. यामध्ये विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देत त्यांच्या उपजीविकेचीही काळजी घेण्यात आली आहे, ही बाब समावेशक विकासाचे उत्तम उदाहरण आहे. विकासाच्या प्रक्रियेत समाजातील शेवटच्या घटकाचाही समावेश झाला पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.