
सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ व गोदाघाट तसेच नाशिक येथील द्वारका सर्कल तसेच ओझर विमानतळ येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाची माहिती घेतली. यावेळी कामांची गती वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव तथा पालक सचिव एकनाथ डवले, आमदार हिरामण खोसकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. एस. व्ही. स्वामी, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, एमएसआयडीसीचे अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.