
महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहमदनगर आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत थकीत वेतन, बंद व आजारी साखर कारखाने सुरू करणे, कामगारांचे पुनर्वसन, कायम व कंत्राटी कामगारांच्या वेतनाचे प्रश्न, शासकीय योजनांचा लाभ तसेच महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ पूर्ववत लागू करण्याच्या मागण्यांवर चर्चा झाली. संबंधित विभागांनी आपापल्या अधिकारक्षेत्रातील प्रश्नांचा आढावा घेऊन समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
२२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेल्या बेमुदत संपात सात सहकारी आणि तीन खासगी साखर कारखान्यांतील कामगार सहभागी झाले होते. मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर साखर कामगार महासंघाने संप तूर्तास स्थगित केल्याचे जाहीर केले.