
वयंसहाय्यता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार फराळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्राहकांच्या प्रत्यक्ष नजरेसमोर ताजा फराळ तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे फराळाची स्वच्छता, गुणवत्ता आणि ताजेपणाबाबत ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे. महोत्सवासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्याने त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेली ताजी शेव, खुसखुशीत अनारसे, विविध प्रकारच्या करंज्या, चिवडा तसेच अस्सल देशी तुपातील बेसन व रव्याचे लाडू असे पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ उपलब्ध आहेत.