
पात्र नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. यापुढे दर तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी नियमितपणे हे अभियान घेण्यात येणार आहे.
महसूल, इतर मागास बहुजन कल्याण आणि संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरे घेऊन पात्र नागरिकांना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्न व अधिवास दाखल्यांसह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन शिबिरादरम्यान प्रमाणपत्रांचे त्वरित वितरण करण्यात येणार आहे. शिबिरांचे ठिकाण व वेळ जिल्हा व तालुका प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येईल.