
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गरजू महिला व बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोषण माहच्या माध्यमातून शहरासह राज्यातील पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अनाथ बालकांसाठी बालकाश्रम, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना गुणवत्तेच्या आधारे मुंबई व उपनगरातील वसतिगृहांमध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कौशल्य विकास व रोजगार तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.