
नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून राज्यातील तरुणांमधील नाविन्यपूर्ण विचार आणि स्टार्टअप्सना योग्य दिशा देण्याचे काम या कराराच्या माध्यमातून होईल, असे मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील तळागाळातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञान-आधारित प्रभावी उपाय शोधणे यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांचा सहभाग वाढविणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी व संभाव्य उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.