
गणेशोत्सवातील सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांचा सहभाग, देखावे आणि समृद्ध परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, असे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या परंपरा, कथा, आठवणी आणि कलाविष्कार नागरिकांनी bappa.org या व्यासपीठावर शेअर करावेत, असे आवाहन करण्यात आले. यामुळे गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचविण्यासोबतच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यतेसाठी सांस्कृतिक दस्तऐवजीकरणास मदत होणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.