
भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीतील मोठा अडथळा असून, त्याच्या निर्मूलनासाठी शासन, नागरिक आणि खासगी क्षेत्रासह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिज्ञेत नमूद करण्यात आले.
भ्रष्टाचारामुळे विकासाची गती मंदावते आणि सार्वजनिक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. भ्रष्टाचारमुक्त समाजाची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशांतून केले. राज्यात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या सप्ताहाचे ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ हे ब्रीदवाक्य आहे.