
यावेळी त्यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि उपसभापती उमाश्री यांची सदिच्छा भेट घेऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विधिमंडळ कामकाजासाठी डॅशबोर्डप्रणाली यशस्वीपणे राबविण्यात येत असून, याच धर्तीवर कर्नाटकातही आधुनिक डॅशबोर्ड प्रणाली लागू करण्याची संकल्पना उपसभापती सचिन अहिर यांनी मांडली. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे कर्नाटक शासनाकडून सांगण्यात आले. तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील विधिमंडळीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांना महाराष्ट्र विधान भवनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
या दौऱ्यात उपसभापती सचिन अहिर यांनी कर्नाटकचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री यू. टी. खादर यांचीही भेट घेऊन आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव डॉ. विलास आठवले उपस्थित होते.