
या अभियानांतर्गत विविध वॉर्डांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवून लोकसहभाग आणि निस्वार्थ जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. घोडपदेव सार्वजनिक मंडळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ई’ वॉर्ड मधील घोडपदेव येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. मनपा उद्यान विभाग, ‘ए’ वॉर्डच्या वतीने फोर्ट परिसरातील शहीद भगतसिंग मार्गावर राजपुष्प असलेल्या ‘ताम्हण’च्या दोन वृक्षांचे रोपण करण्यात आले.
अभियानांतर्गत प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रमांमधून केवळ नागरिकांच्या आरोग्याचीच काळजी घेतली नाही, तर हरित आणि निरोगी परिसराचा संकल्पही अधिक दृढ केला आहे.