
या शिबिरात अधिवास प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे आणि नॉन-क्रिमीलेअर दाखल्यांसह विविध प्रकारच्या ३७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवीन मतदार नोंदणी, तसेच निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते.
राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उद्देश शासकीय सेवा व कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत थेट आणि पारदर्शकपणे पोहोचविणे हा आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी विविध शासकीय सेवा व योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.