
सर्वसामान्यांना दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
नागपूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जात असून, देशात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वैद्यकीय पर्यटनाला (मेडिकल टुरिझम) चालना मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी जन आरोग्य योजनेत २,४०० आजारांचा समावेश करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

न्यू एरा रुग्णालयात ३०० खाटांची सुविधा, एआय आधारित डिजिटल मॅमोग्राफी आणि तातडीने एमआरआय तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक आनंद संचेती यांनी दिली. या सुविधांमुळे रुग्णांना, विशेषतः कर्करुग्णांना, दिलासा मिळणार आहे.
यावेळी माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.