
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थकुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित या उपक्रमाने भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडविले. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन यांनी सहभागींचे अभिनंदन करत हा विक्रम देशाच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तयारीत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच भाविकांचे आपुलकीने स्वागत करून स्वच्छता, वाहतूक आणि अन्य सुविधांसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वर येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे.