
पुणे यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरास भटके-विमुक्त विकास परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे, शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल, असे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांचे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.